सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
वीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर गणेशमूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले असून रसायनी पाताळगंगा परिसरासह ग्रामीण भागातही मूर्तींकार दिवस रात्र मग्न असलेले पहावयास मिळत आहेत. मोहोपाडा नविन पोसरी येथील मूर्तिकार रुपेश दळवी यांच्याकडे गणेशमूर्तींला रंग देण्याच्या कामाला गती मिळाली आहे.परिसरात मूर्तीकार , रंगकाम करणारे कारागीर गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवत असून मूर्ती विक्रेत्यांनी ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रीला ठेवून विक्रेते गि-हाईंकांची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.
गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरत असताना मूर्तींचा जीव असणारे डोळे ,किरीट, त्रिशूळ,गंडक आदींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे.यामध्ये मूर्ती आकर्षक व रेखीव दिसण्यासाठी डोक्याच्या किरीटास सोनेरी,सिंहासनास फिकट गुलाबी, पाठीमागील आसनास लाल,हिरवा, पिवळा, केशरी आदी रंगांनी गणेशमूर्तींचा पुरवठा केला जात आहे.गणेशमूर्ती आकर्षक होण्यासाठी पर्लं कलर व चकमक यांची नवीन डिझाईन आहेत.त्यामुळे ग्राहकांचा या डिझाईनच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे कल आहे.
घरगुती पुजेच्या मूर्तींना खूप मागणी वाढली आहे.यामुळे सध्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही गणेशोत्सवाची चाहूल लागल्याने गणेशमूर्ती रंगविण्याच्या व विक्री करण्याच्या कामाला वेग आला आहे.
Be First to Comment