Press "Enter" to skip to content

श्री म्हैसेश्वर मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी देवेंद्र तांडेल यांची बिनविरोध निवड

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

सन २०१६ साली स्थापन झालेल्या उरण तालुक्यातील करळ येथील श्री म्हैसेश्वर मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र वसंत तांडेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती २०२१-२०२२ या एका वर्षाकरिता झाली आहे.

श्री म्हैसेश्वर मित्र मंडळ करळच्या माध्यमातून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी मंडळ ६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अशा या म्हैसेश्वर मित्र मंडळात अध्यक्षपदी म्हणून कु. देवेंद्र वसंत तांडेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.उपाध्यक्ष- धीरज सुर्यकांत तांडेल, खजिनदार -चेतन बबन तांडेल, सहखजिनदार -मितेश जगदीश तांडेल, सेक्रेटरी- यतिश जगदीश तांडेल, सल्लागार- सतीश अनंत तांडेल, सदस्य -परेश कडू, हितेंद्र तांडेल, अमित घरत, सचिन तांडेल, कुणाल कडू, दिपेश तांडेल यांच्यासह एकूण 31सदस्यांचा या म्हैसेश्वर मित्र मंडळात समावेश आहे.

श्री म्हैसेश्वर मित्र मंडळ करळच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प केल्याचे नवनियुक्त अध्यक्ष देवेंद्र वसंत तांडेल यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.