भारती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्षापूर्ती निमित्ताने उपक्रम
सिटी बेल | वहाळ |
भारती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्षापूर्ती निमित्ताने श्री साई देवस्थान साई नगर वहाळ येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी हिंगोली चे माजी आमदार भाऊसाहेब गोरेगावकर त्यांच्यासमवेत प्रभाकर पवार संचालक जालना जिल्हा मध्यवर्ती बँक, शिवराज पाटील, रणजित गोरेगावकर तसेच राम कृष्ण महाराज वहाळकर, साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का.पाटील, एन आर आय सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर राहुल वर्मा डॉक्टर संतोष वर्मा यांनी मेहनत घेतली.








Be First to Comment