Press "Enter" to skip to content

पूरग्रस्तांचे मनोधैर्य उंचावणाच्या उद्दिष्ठातून आगरी कोळी मेडिकोज तर्फे पूरग्रस्तांना मदत

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

आगरी-कोळी मेडिकोज (AKM) च्या माध्यमातून व स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महाड पूरग्रस्थांसाठी मदतकार्य करण्यात आले.

महाड येथील आदर्श विद्यालयाचे अतोनात नुकसान झाले होते, विद्यालयाच्या दोन खोल्या तर पूरात वाहून गेल्या. या शाळेत महाडच्या आजूबाजूच्या खेडेगावातील विद्यार्थी शिक्षण घेतात अशी माहिती तेथील प्रतिनिधींकडून मिळाली.शाळेच्या तळमजल्यातील खोल्यांमधील कार्यालय व कागदपत्र वाहून गेली. भिजलेल्या दस्तांचा खच तसेच प्रयोगशाळेची अवस्था अतिशय दयनीय होती. सर्वच पूरात वाहून गेल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प होते. शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी शाळेचं कामकाज सुरू करण्यासाठी काॕम्प्यूटरची गरज असल्याचे तेथील संपर्कातील प्रतिनिधिनी सांगितले व आगरी-कोळी मेडिकोज(AKM) च्या माध्यमातून या शाळेसाठी नवीन काॕम्प्यूटर भेटस्वरूपात देण्यात आला. ही भेट स्विकारताना तेथील शिक्षकवृंद भारावून गेले.

परांजपे विद्यालय महाड या शाळेचा पहिला मजला पूराच्या विळख्यात होता. तीथे संपूर्ण ग्रंथालय भिजले व अनेक संदर्भ ग्रंथ भिजून नष्ट झाले. याही शाळेत अनेक गावागावातील विद्यार्थी शिक्षण घेतात व त्या गावात सुद्धा पूराने हाहाकार माजवला होता. विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांचं नुकसान झाले होते.म्हणून आगरी-कोळी मेडिकोज AKM ने अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेत वह्यांची मदत केली.

या पूराचा तडाखा वैद्यकीय सेवेलाही बसला. दवाखाने व हास्पिटल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दवाखाने पुन्हा नव्याने लवकरच सुरू व्हावेत व महाडकरांना पुरेशी वैद्यकीय सुविधा मिळावी ह्या उद्देशाने अनेक वैद्यकीय संघटनांनी मदतीचा हातभार लावला. आगरी कोळी मेडिकोज(AKM)तर्फे वैद्यकीय उपकरणांची अल्पशी मदत करण्यात आली ही मदत पुरेशी नसली तरी डाॕक्टरांचं मनोधैर्य उंचावण्यास नक्कीच मदत करेल.त्याचबरोबर गरजूंना कपडे व इतर साहित्याचं वाटप करण्यात आले. स्थानिक सहकाऱ्यांकडून परिस्थितीचा अभ्यास करून यापुढे कशाप्रकारे सहकार्य करता येईल याचा आढावाही आगरी कोळी मेडिकोजच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.

आगरी-कोळी मेडिकोज AKM च्या या मदतकार्यातील पथकात डॉ दिनेश म्हात्रे AKM अध्यक्ष डोंबिवली, डॉ संजीव म्हात्रे AKM उपाध्यक्ष उरण, डॉ तपन पाटील AKM उपाध्यक्ष कल्याण, डॉ दिनेश गावंड AKM पनवेल, डॉ जयेश शेळके AKM सचिव भिवंडी, डॉ संतोष आगलावे पनवेल, डॉ मिलींद म्हात्रे भिवंडी, डॉ आशिर्वाद मोकल पेण, डॉ राजेंद्र पाटील पोलादपूर, प्रा.प्रभाकर गावंड व स्थानिक सहकारी मित्र सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.