सिटी बेल | उरण |
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कोरोना महामारीत केलेल्या सामाजिक कार्य, आरोग्य विषयक कार्य व रक्तदान शिबिरे आशा विविध कार्याने प्रभावित होऊन अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम यांच्या प्रयत्नाने फिरोज मुकरी, अबरार पटेल, शाहीद पटेल, फैज हुसैन, मोहम्मद शेख, विदाद सोंडे, मोहम्मद शैजार, मोजीद शेख, सैफ, कैस कादरी, आवेश शेख, सलीम कालुसकर, मौझाम मुन्शी, अमान शेख, अयान शेख, अहमद तुंगेकर यांनी आपल्या कुटूंबियांन सहित शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी सर्वाना भगवी शाल अर्पण करून सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. या प्रसंगी शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, नगरसेवक समीर मुकरी,अल्पसंख्याक सेल चे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, युवासेना शहरअधिकारी नयन भोईर बालई शाखाप्रमुख सुरज मढवी व युवासेना अधिकारी अरहाम शेख, मनोहर घरत व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment