Press "Enter" to skip to content

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रास रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने मिळाली रुग्णवाहिका

राजिप उपाध्यक्ष तथा शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते झाले लोकापर्ण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

रायगड जिल्हापरिषदेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात आलेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण राजिप उपाध्यक्ष तथा शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले.

रायगड जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार कर्जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ करीता नवीन रुग्णवाहिका देण्यात आली आहे, राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांन जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा करून नवीन रुग्णवाहिके साठी प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द करून शासनाच्या माध्यमातून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतली. घारे यांच्या या प्रयत्नामुळे नेरळ विभागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी गटविकास अधिकारी बालाजी पुरी, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष भागवन चंचे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष रंजना धुळे, जिल्हा परिषद सदस्या अनुसया पादीर, सभापती, उपसभापती, पदाधिकारी, कार्येकर्ते आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.