Press "Enter" to skip to content

आदिवासी शाळा व अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप

स्टेपआर्ट कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे उपक्रम

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

स्टेप आर्ट, संस्थेच्या जेष्ठ मार्गदर्शिका,आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सुनंदा मनोज कुमार मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुनाडे, कोप्रोली, रानसई आणि वेश्वि अश्या आदिवासी वाडीवरील शाळा व अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य (वह्या, पेन पेन्सिल, पट्टी, खोडरबरआणि शार्पनर) व खाऊ वाटप करण्यात आले.

नृत्य अविष्कारात टीव्ही वरील अनेक शो मध्ये पुरस्कार प्राप्त आणि लोकांची मने जिंकणाऱ्या या संस्थेने 2 वर्षापूर्वी सामाजिक कार्याकडे वळताना कोरोना काळात गरजूंना 800 हुन अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, चिरनेर परिसरातील 90 वीटभट्टी महिला कामगारांना नवीन साडी वाटप कुटुंबाला दिवाळी फराळ, आदिवासी वाडी आणि वृद्धाश्रमात रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून विनामूल्य नृत्याविष्कार सादर करून आपल्या सामाजिक कार्याची छाप पाडली आहे.

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षिका सुनंदा कुमार मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष पप्पू सूर्यराव आणि सचिव सुनिल वर्तक आणि सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सामाजिक उपक्रमात रायगडभूषण राजू मुंबईकर, उपाध्यक्षा- स्नेहा गोडे, जीवन डाकी, रवी म्हात्रे प्रतिक बाईत, अक्षय घरत, अतिष पाटील, सुशांत पाटील, स्टेप आर्ट च्या नृत्यांगना आणि सारडे विकास मंच, गोल्डन ज्यूबली, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात शाळा आणि अंगणवाडीतील शिक्षक, संदीप भोपळे सर, कोळी सर, कडू मॅडम, रमणिक सर आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम लांबला गेला असला तरी आदिवासी चिमुकल्या मुलांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याच्या छटा पाहून उत्सवमूर्ती सुनंदा कुमार मॅडम यांनी समारोपात निसर्ग रम्य वातावरणातील आजचा आयुष्यातील अविस्मरणीय वाढदिवस मी कधीच विसरू शकत नसल्याचे सांगून सर्वांना धन्यवाद दिले.कार्यक्रमाचे निवेदन नितेश पंडित, आणि सुनिल वर्तक यांनी केले तर पप्पू सूर्यराव यांनी सर्वांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.