सिटी बेल | पनवेल |
७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अष्टविनायक फाउंडेशन, मुंबई ऑन्कोलॉजि सेंटर (एम. ओ. सी.) आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांनी संयुक्तपणे ४० वर्षे वयोगटातील स्त्रियांसाठी मॅमोग्राफी शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते.
हे शिबीर खांदा कॉलोनी येथील अष्टविनायक हॉस्पिटल येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० यावेळेत करण्यात आले होते. तसेच कर्करोगासाठी विशेष ओ पी डी कक्षाचे उदघाटन अष्टविनायक हॉस्पिटल येथे डॉ. अक्षदीप अगरवाल, कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर स्मित सेठ आणि रोटरी चे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबीराचे उदघाटन रोटरी क्लबच्या सर्व अँस यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबारासाठी पनवेल, खांदा कॉलनी, उरण, उलवे, खारघर, कलंबोली आणि मुंबई येथील एकूण ३१ महिलांनी लाभ घेतला.
डॉ. स्मित सेठ यांनी कर्करोगाबद्दल महत्वाची माहिती उपस्थितांना करुन दिली.
अष्टविनायक हॉस्पिटलचे डॉ. अक्षदीप अगरवाल यांनी रायगड मधिल सर्व लोकांना ह्या विशेष ओ. पी. डी. द्वारे अनेक कर्करोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून लवकरच नविन पूर्णवेळ कर्करोग
हॉस्पिटल सुरु करण्याचा आपला मानस असल्याचे व्यक्त केले.
तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे अध्यक्ष रो. रुपेश यादव यांनी
ह्या विशेष ओ पी डी द्वारे दर महिन्याला ५ कर्करोग रुग्णांना मोफत सेवा अष्टविनायक हॉस्पिटल आणि रोटरी मार्फत देण्याचे सांगितले. तसेच त्यांनी रोटरीच्या वतीने अष्टविनायक हॉस्पिटल व एम ओ सी चे आणि सहभाग नोंदवलेल्या सर्व महिलांचे विशेष आभार व्यक्त केले.

यावेळेस महिलांमधून ऍडव्होकेट दिव्या आंबेकर यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अष्टविनायक हॉस्पिटल आणि एम ओ सी च्या मेडिकल टीमसहित रो. विजय गोरेगांवकर, रो. प्रदीप ठाकरे, रो. दिलीप जाधव, रो. अर्चना जाधव, क्लबचे सेक्रेटरी रो. बाळकृष्ण आंबेकर आणि रो. विजयकुमार कुलकर्णी हे उपस्थित होते.








Be First to Comment