Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने एकाचा मृत्यू तर एक बरा

उरणकरांनो सावधान : उरणमध्ये डेल्टा प्लस विषाणूचा शिरकाव

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी झालेले दिसत असतानाच डेल्टा प्लस विषाणूचे दोन रुग्ण आढळले त्यातील नागोठणे येथील एकाचा मृत्यू तर उरणमधील रुग्ण यातून सुखरूप बचावला आहे. यावरून उरणमध्ये डेल्टा प्लस विषाणूचा शिरकाव झाल्याचे उघड होत आहे.

याबाबत महिन्याभरानंतर अहवाल हा पुणे येथून आरोग्य विभागाकडे आला आहे. रायगडात डेल्टाचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाने खबरदारीची पावले उचललेली आहेत. डेल्टा आजार झालेल्याच्या संपर्कात आलेल्या साधारण ४१ जणांचे स्वॅब तपासणी साठी पाठविले असून यापैकी अद्याप कोणाचाही डेल्टाची लागण झालेचे रिपोर्ट आलेले नाहीत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली आहे.

नागोठणे येथील जेष्ठ नागरिक याना कोरोना लागण झाली होती. त्यामुळे ५ जुलै रोजी त्यांना अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयू कोव्हिड कक्षात ठेवण्यात आले होते. २२ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी १५ जुलै रोजी त्याचा स्वॅब डेल्टा विषाणू तपासणीसाठी पुणे राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळा येथे पाठविण्यात आला होता. मृत्यूच्या महिन्याभरानंतर त्यांना डेल्टाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तर उरण येथील शिक्षका असलेल्या महिलेला कोरोना लागण झाली होती. त्यांचाही डेल्टा तपासणी साठी स्वॅब पाठविला होता. शिक्षिका महिला पूर्ण बऱ्या झाल्या असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. मात्र अद्याप कोणालाही डेल्टाची लागण झाल्याचा रिपार्ट प्राप्त झालेला नाही. नागरिकांनी कोव्हिडच्या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन डॉ. सुहास माने यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असतानाच डेल्टा प्लस विषाणूचा शिरकाव रायगड जिल्ह्यात झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.