कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यामध्ये आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नांना यश : लवकरच ठेवीदारांना मिळणार पैसे
सिटी बेल | पनवेल |
कर्नाळा नागरी सहकारी बँक अनियमितता प्रकरणामध्ये ठेवीदारांचे 529 कोटी रुपये अडकलेले आहेत. यातील दोषींना अटक करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न झाल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवींचे काय होणार ? हा प्रश्न मात्र अधांतरीच होता.
आमदार बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे मिळवण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू होते. बँकेच्या ठेवींच्या विम्याचे पैसे मिळविण्यासाठी बँक अवसायनात काढणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी बँकेचा परवाना रद्द होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते.

रिझर्व्ह बँकेचे ठेवीदार संरक्षक मंडळाकडे आमदार बाळाराम पाटील सातत्याने बँकेचा परवाना रद्द करण्यासाठी मागणी करत होते. ज्यामुळे बँक अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल व किमान पाच लाखापर्यंत च्या ठेवी परत देण्याचा मार्ग सुकर होईल.
ठेवीदार संरक्षक मंडळाने शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आदेश पारित करून कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.त्यामुळे आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच बँक अवसायनात काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल व विमा संरक्षण कवचाचे अंतर्गत पाच लाख रुपयांच्या ठेवी लवकरच दिल्या जातील.












Be First to Comment