Press "Enter" to skip to content

कर्जतमधील श्री नारायण हॉस्पिटल मध्ये पाहीले खाजगी लसीकरण केंद्र सुरू

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड‌ |

कर्जत शहरामध्ये डॉ. घन:श्याम नाझिरकर यांच्या श्री नारायण हॉस्पिटल मध्ये पहिले खाजगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

कर्जत शहरातील श्री नारायण हॉस्पिटल मध्ये खाजगी कोव्हीशिल्ड लसीकरण केंद्राचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल,कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मनोज बनसोडे, कशेळे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विक्रांत खंदाडे, कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मुकेश ओसवाल, नगरसेवक संकेत भासे, नगरसेविका विशाखा जिनगरे, भाजपचे नेते सुनील गोगटे, दीपक बेहेरे, मंदार मेहेंदळे उपस्थित होते.

डॉ. घन:श्याम नाझिरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हॉस्पिटल मध्ये रोज सकाळी 8-30 ते 9-30 एक तास लसीकरण उपलब्ध असेल तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी सकाळी 8-30 ते सायंकाळी 5-00 वाजेपर्यत केंद्र सुरू राहील असे डॉ. नाझीरकर यांनी सांगितले. मो.9850393949 व 8237930446 वर संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.