सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोह्यातील प्रकाश वाघमारे यांची सुकन्या व आयुर्विमा महामंडळ रोह्याचे अधिकारी यांची पुतणी असणारी कु.मोहक प्रकाश वाघमारे हिने बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत उज्ज्वल यश संपादित करून ९४ % इतके गुण संपादित केले आहेत.
बालवयापासून प्रत्येक बाबतीत हुशार व विविध कलाकौशल्ये अंगी असणाऱ्या मोहकचे सर्व शालेय शिक्षण जे.एम.राठी इंग्लिश स्कूल रोठ रोहा येथे झाले. तर बारावी बोर्डाची परीक्षाही तिने राठी हायस्कूलमध्ये पूर्ण केले. आपली हुशारी व विविध गुणकौशल्य अंगी असणारी मोहक ही काँलेजमध्ये सर्वच बाबतीत नेहमीच प्राधानान्याने पुढे असायची.बारावी परीक्षेत वि्ज्ञान शाखेतून ९४ % इतके गुण संपादित केले असल्याने आमच्या परिवाराचे व समाजाचे तसेच राठी हायस्कूलचेही नावलौकिक केले असल्याची भावना आयुर्विमा अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.
तिच्या या सुयशाबद्दल राठी हायस्कूलचे सर्व व्यवस्थापन अधिकारी, सर्व शिक्षकव्रुंद तसेच समाजातील सर्व स्तरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व शिक्षणप्रेमी नागरिक यांच्याकडून अभिनंदन व्यक्त केले जाऊ लागले आहे.








Be First to Comment