Press "Enter" to skip to content

नागोठण्यातील जुने रामेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने पुजन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

येथील प्रभू आळी परिसरात असलेल्या पुरातन पेशवे कालीन श्री जुने रामेश्वर मंदिरात श्रावणातल्या पहिल्याच सोमवारी शिवलिंगाचे पुजन केले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांनी यावेळी कोविड १९ च्या शासकीय नियमाचे पालन केले.

या जुने रामेश्वर मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याचे अधिकार येथील कायस्थ प्रभू समाजाच्या विश्वस्त समितीकडे असल्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कायस्थ प्रभू समाज विश्वस्त समितीच्या वतीने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या शिव भक्तांसाठी शिस्तबद्ध नियोजन व व्यवस्था केली होती.

त्यामुळे आज पहिल्याच श्रावणी सोमवार निमित्त सकाळपासूनच जुने रामेश्वर मंदिरात शिवभक्त नागरिक, महिलांसह अबाल-वृध्दांची गर्दी झाली होती. मंदिरातील शिवलिंगावर मोठ्या संख्येतील शिवभक्तांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला. मंदिराच्या विश्वस्त समितीच्या पदाधिकाऱ्यांसह समाजातील सर्व तरुण वर्ग व महिला मंडळाने हा पहिलाच श्रावणी सोमवार उत्साहात साजरा करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.