सिटी बेल | रोहा | नंदकुमार मरवडे |
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवा मंडळ मुंबई आयोजित इयत्ता अकरावी सीईटी मार्गदर्शन व्याख्यानमालेत सु. ए. सो. माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक टिळक खाडे यांनी यु ट्यूबवरील थेट प्रक्षेपणात अकरावी सीईटी संदर्भात विज्ञान विषयाचे व या परीक्षेतील तांत्रिक बाबींचे सखोल व मौलिक मार्गदर्शन केले .
विज्ञान शिक्षक टिळक खाडे यांनी आपल्या व्याख्यानात सीईटीचे स्वरुप , गुणविभागणी , विविध प्रश्नप्रकार , ओ.एम.आर . उत्तरपत्रिका , वेळेचे नियोजन आदी तांत्रिक बाबींचे तसेच विज्ञानातील गुरुत्वाकर्षण , मूलद्रव्यांचे वर्गीकरण , रासायनिक अभिक्रिया , विद्युतधारेचे परिणाम , उष्णता , प्रकाशाचे अपवर्तन , धातुविज्ञान , कार्बनी संयुगे , अवकाश मोहिमा , आनुवंशिकता व उत्कांती , पेशीविज्ञान , जैवतंत्रज्ञान , आपत्ती व्यवस्थापन इत्यादी घटकांचे पाॅवर पाॅईंट प्रेझेंटेशनद्वारे सहजसोप्या शैलीत विवेचन केले .
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांना व प्रश्नांना टिळक खाडे यांनी उत्तरे दिली . या मार्गदर्शनामुळे पहिल्यांदाच होत असलेल्या सीईटी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला अशी प्रतिक्रिया उपस्थित विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी दिली .
या ऑनलाईन मार्गदर्शनाचा सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी यु ट्यूबवरील थेट प्रक्षेपणाद्वारे लाभ घेतला . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे , आभारप्रदर्शन प्रा.अमित मोहित तर सूत्रसंचालन पुवा कार्यकर्ती प्रतिक्षा कलप यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणबी युवा मंडळाचे डाॅ. सागर सानप , डाॅ. विजय वीर , प्रा. डाॅ. राजेश शिगवण आदी कुणबी यवा मंडळाच्या पदाधिका-यांनी व तळा तालुका आय. टी. व शिक्षण विभागाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.








Be First to Comment