सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.शिवाय लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी , नागरिकांना होणारा मानसिक त्रास लक्षात घेऊन तळवली गावातील नागरिकांना लसीकरण मिळावे या हेतूने पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तळवली येथील बिर्ला कार्बंन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला वडगाव ग्रामपंचायत सरपंच गौरी महादेव गडगे व सदस्यांकडून विनंती करण्यात आली होती.
यानुसार बिर्ला कार्बंन इंडिया कंपनीकडून तळवली गावातील अठरा वर्षांपुढील ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले.यावेळी लसीकरण मोहीमेचे उदघाटन सरपंच गौरी महादेव गडगे यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी बिर्ला कार्बन कंपनीचे युनिट हेड हनुमान गुप्ता, मॅनेजर प्रकाश देसाई, सचिन कुंदले, हरेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य संदेश जगन्नाथ माळकर,शिवाजी तुकाराम शिंदे,मदन ठोंबरे आदीसह वडगाव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान तळवलीतील एकूण 271 ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले.बिर्लां कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तळवली गावातील ग्रामस्थांना मोफत लसीकरण दिल्याने ग्रामस्थांच्यावतीने सरपंच गौरी महादेव गडगे यांनी बिर्ला कार्बंन व्यवस्थापनाचे आभार मानले.तसेच सध्याची कोविड लसीकरण केंद्रावरील परिस्थिती पाहता इतर कंपन्यांनीही परीसरातील नागरिकांसाठी लसीकरण करण्यासाठी सहकार्य करावे असा आशावाद सरपंच गौरी गडगे यांनी बोलताना व्यक्त केला.शिवाय कोरोनाचे प्रमाण रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत,सोशल डिस्टिंक्शन पाळावे, वेळोवेळी सॅनिटायझर ,मास्कचा वापर करावा असे आवाहनही सरपंच गौरी गडगे यांनी केले आहे.








Be First to Comment