सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ . मृत्युंजय पांडे सर यांनी तोंडभरून कौतुक करून मुंबई विद्यापीठामध्ये सेंट विल्फ्रेड कॉलेजचे वेगळं स्थान निर्माण झालं आहे त्याचे श्रेय त्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाला दिले. या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी वकिलीक्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहेत. महाविद्यालयात शिकणारे अनेक विद्यार्थी अत्यंत हुशार आणि अभ्यासू आहेत . महाविद्यालयात अध्यापन करणारे सर्वच प्राध्यापक यांची शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळेच कॉलेजचे नाव आघाडीवर गेले आहे.
वकिली क्षेत्रातून विद्यार्थ्यांना समाजात सुजाण नागरिक सोबत यशस्वी जीवन जगण्यासाठी कायद्याचे शिक्षण संपूर्ण आयुष्य उपयोगी येणार आहे . विद्यार्थ्यांनी सामाजिक भावनेतून समाजातील वेगवेगळे प्रश्न सोडविण्यासाठी कायद्याचा योग्य वापर करून गोरगरीब जनतेला मदतीच्या उद्देशाने मदत केली पाहिजे असे आवाहन प्राचार्य पांडे सर यांनी केले.
उच्च ज्ञान प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी शिकण्याची वृत्ती जोपासली पाहिजे.
विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास आणि जमिनीवर पाय ठेऊन याचे भान जोपासून आपली प्रगती आणि अभ्यास केले पाहिजे अशी अपेक्षा हि त्यांनी बोलून दाखवली. महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक वर्ग आपल्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी तत्पर असून परीक्षा पद्धती हि अत्यंत पारदर्शन पद्धतीने होऊन गुणांचे मुल्ल्यांकन केले जाते .

महाविद्यालयाचा संपूर्ण कारभार हा पारदर्शी असून महाविद्यालय बद्दल कोणी समाजात अफवा पसरवीत आहेत त्याकडे दुर्लक्ष करा आणि विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हा असेही त्यांनी स्पष्ट नमूद केले . आगामी काळात जेष्ठ विधी तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला तर कोरोना काळात पूर्वी सारखे महाविद्यालयीन कार्यक्रम होत नसल्याने कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा सर्वच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये एकत्र आणण्याचा विचार देखील प्राचार्य पांडे सर यांनी बोलून दाखवला .
यावेळी प्राध्यापक ललित पगारे , प्राध्यापिका कमीला बेग मॅडम यांनीहि आपले बहुमूल्य विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रायगड जिल्ह्याच्या पनवेल ( शेडुंग) येथे असणाऱ्या सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेज मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून कॉलेज मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली .
यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय पांडे सर ,प्राध्यापक ललित पगारे सर ,प्राध्यापक आर सी राय ,प्राध्यापिका कमीला बेग मॅडम ,कार्यालयीन अधीक्षक पंकज पाटील , अलिशा जगताप आवर्जून उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, गणेश पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले याया नंतर यावेळी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी ईशस्तवन साजरे करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरवातीलाच विद्यार्थी अमोलराजे पाटील यांनी प्रास्ताविक केले.विधी महाविद्यालयात शिकविणारे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वर्ग यांचं सर्वच विद्यार्थ्यांच्या वतीने आभारवजा ऋण व्यक्त केले .तदनंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल , श्रीफळ , गुलाब पुष्प देऊन स्वागत , सन्मान सोहळा पार पडला.
या नंतर कॉलेज मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले संजय गायकवाड, संदेश घरत ,निलेश म्हात्रे , डॉ . रुख्मिणी ललित या विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला तर रात्रशाळेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आपल्या परीने आपल्याच विद्यार्थ्यंना जे रोजच्या रोज गुगल मीट द्वारे शिकवणे सुरु केले त्या उपक्रमात विद्यार्थी सहकार्यांना शिकविणारे विद्यार्थी मित्र निलेश म्हात्रे, अमोलराजे पाटील ,संदीप नाणेकर, मानसी पाटील यांचाही विद्ययार्थ्यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते दासबोध ग्रंथ,भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोलराजे पाटील ,संजय गायकवाड , निलेश म्हात्रे , संदीप नाणेकर , योगेश भोसले , मनोहर देशमुख ,अरविंद शिलीमकर ,नरेश म्हात्रे , मानसी पाटील , डॉ. रुख्मिणी ललित धायगुडे ,शरद निकुंभ ,संजय सादले ,राजेश्री महाजन ,दर्शना धारवाड-मुंडे,ऋता सारंगे , हर्षदा जांभुळकर ,हरेश मुंडे, प्रफुल्ल गुडेकर,स्मिता कुठे ,तारे ,विशाल थोरात , संदेश घरत ,योगिता म्हात्रे, पूर्वी कोशे ,मनीषा डायरे ,पूनम वाघमोडे, नानासाहेब वाघमोडे , अस्मिता शिंदे ,श्रीकृष्ण आपटे ,रुपाली हरणशिखरे आदींनी परिश्रम घेतले. तर शेवटी आभार प्रदर्शन विद्यार्थी योगेश भोसले यांनी केले .








Be First to Comment