सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब,ता.रोहा संचलित श्री. रा.ग.पोटफोडे(मास्तर) व द.ग.तकटरे ज्युनिअर काँलेज खांब यांनी एच.एच.सी.परीक्षेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी येथील एच.एच.सी. बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लावण्यात यश मिळविले आहे.
एच.एच.सी.परीक्षेची १००% उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखीत येथील ज्युनि. काँलेजमध्ये प्रथम क्र. धामणसे स्वाती ८०%,द्वितीय क्र.महाडिक प्रणित ७७%,तुतीय क्र.भोसले सानिध्या ७५% तर चोरगे अर्पिता हिने ७४% गुण संपादित करून चतुर्थ क्र.पटकावला आहे. विद्यार्थी वर्गाने मिळविलेल्या या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष राम कापसे,सचिव धोंडू कचरे व संचालक मंडळ,येथील प्रा.सुरेश जंगम व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विभागातील शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







Be First to Comment