सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
तळेगाववाडी शाळेचे मुख्याध्यापक तसेच उपक्रमशील शिक्षक सुरेश मांडे यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मांडे सर यांच्या संकल्पनेतून शाळेतील मुलांना शैक्षणिक उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर वाटप प्रसंगी माजी सरपंच संदीप मुंढे उपस्थित होते.
कोरोनाकाळात आपला परिसर कोरोनामुक्त राहावा, यासाठी आरोग्यसेवकांच्या खांद्याला खांदा लावून उत्तम कामगिरी तळेगाववाडी येथील मुख्याध्यापक सुरेश मांडे यांच्या माध्यमातून होत आहे.तळेगाववाडी शाळेचा वस्तीशाळेपासून डिजिटल शाळेपर्यंत कायापालट करण्यासाठी सुरेश मांडे यांनी मोलाचे योगदान केले आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शाळोपयोगी वस्तूंचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच संदिप मुंढे,माजी उपसरपंच अमित मांडे,संतोष पाटील ,सुधिर शिंदे , ग्रामपंचायत सदस्य संतोष मैदर्गींकर, देविदास म्हात्रे शिवदास जगताप ,विनायक डवळे, दिनेश चव्हाण, भरत मांडे, नथुराम मांडे ,नंदकुमार खराल ,राजेश खराळ, विनायक गायकवाड, गुरूनाथ मांडे,गणेश मांडे ,जनार्दन मांडे , प्रशांत शेलार, पांडुरंग मांडे आदी उपस्थित होते.
उपशिक्षक अमोल मिडगुले यांनी आपल्या मनोगतामध्ये तळेगाववाडी शाळेचा वस्तीशाळेपासून डिजीटल शाळेपर्यंत कायापालट करण्यासाठी सुरेश मांडे सर यांनी घेतलेले परिश्रम तसेच मोहोपाडा परिसरातील शैक्षणिक योगदानाबाबतही अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मिडगुले सर यांनी केले व सुनिता म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.








Be First to Comment