Press "Enter" to skip to content

सुरेश पाटील यांची भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

भारतीय मजदूर संघाच्या कार्यकारिणीची सभा रोहा येथे शासकीय विश्राम गृहाच्या सभागृहात जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेसाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.अनिल डुमणे, महाराष्ट्र उपाध्यक्ष एस.के.सिंग, सरचिटणीस मोहन येनुरे,संघटन मंत्री एँड.श्रीपाद खुटापकर, सचिव, अँड.विशाल मोहिते, कोकण विभाग संघटक हरी चव्हाण,मुंबई-ठाणे विभाग संघटक संघटक पुरोहित,मुंबई विभाग अध्यक्ष बापू धडक रोह्याचे जेष्ठ नेते सुरेश मगर,पनवेल तालुका B.M.S.चे अध्यक्ष रवी नाईक, उरण तालुका B.M.S.चे अध्यक्ष लकेश म्हात्रे, जिल्ह्याच्या सर्व विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सभेमध्ये सुरेश पाटील यांची पुन्हा अध्यक्षपदी एक मुखाने निवड केली. सचिव अशोक निकम, खजिनदार संदीप मगर, तसेच खालील प्रमाणे सर्वांची कार्यकारिणी तयार करण्यात आली ही कार्यकारिणी तीन वर्षासाठी असणार आहे. उपाध्यक्ष मधुकर पाटील -J.N.P.T. उरण, मनोहर निकम-सार्वजनिक बांधकाम, पोलादपूर, प्रसाद कुलकर्णी- M.S.E.B. गोरेगाव, सौ.वर्षा कोलीसते- घरेलू कामगार, माणगाव विरेंद्र निंबाळकर- पोस्ट पनवेल, अशोक पार्टे- महाड सहसचिव, राजेंद्र गुरव -J.S.W. महाड डी.के.जोशी – Viola पाताळगंगा, विजय सुतार – बांधकाम कामगार, भारत जाधव – नगरपालिका श्रीवर्धन, अमित यादव – संरक्षण उरण, कार्यकारिणी सदस्य
श्रीमती निर्मलाताई भुतकर घरेलू कामगार, रोहा श्रीमती गीता बंदुगडे अंगणवाडी शिक्षिका, महाड सौ.मनिषा ढुमणे शाळा व महाविद्यालयात, लिपिक मोरेश्वर देशमुख आठवडे बाजार विक्रेता कोलाड नुरा शेख शिक्षक उरण, विकास पाटील, सुरक्षा रक्षक रोहा, विवेकानंद काळे जीवन प्राधिकरण, अलिबाग श्रीकांत वैद्य। राज्य कर्मचारी, अलिबाग सल्ला व मार्गदर्शन-पालक श्री.रमेश गोविलकर, श्रीधर लहाने आदींची निवड करण्यात आली.

या सभेत सुरेश पाटील यांनी B.M.S.चा जिल्ह्याचा कार्याचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले. तसेच अनिल डुमणे, मोहन एनुरे, श्रीपाद खुटापकर ,विशाल मोहिते यांनी मार्गदर्शन केले. तसेच जे.एन.पी.टी., पेण,रोहा,अलिबाग,महाड,पनवेल, अशा विविध तालुक्यातील कामगारांचा आढावा घेतला व समस्या जाणून घेतल्या. तसेच संघटना वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी प्रयत्न करून संघटना वाढवावी असे प्रतिपादन केले.प्रस्तावना रमेश गोविलकर यांनी केली तर आभार अशोक निकम यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.