Press "Enter" to skip to content

यकृत प्रत्यारोपणाची गरज असलेल्या १९ वर्षीय तरुणाचे वाचविले प्राण

४० % खराब झालेल्या यकृतावर मुंबईत यशस्वी उपचार

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी | मुंबई |

सध्या कोरोनासोबतच कावीळ, मलेरिया डेंग्यू व इतर आजारांची साथ मुंबईत वाढत आहे व अनेक नागरिक वेगवेगळ्या विकारांनी त्रस्त आहेत, अशाच एका केसमध्ये ४० टक्के यकृत खराब झालेल्या १९ वर्षीय युवकाचे प्राण वाचविण्यात घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलला यश आले आहे.

१९ वर्षीय साहिल शमा हा ताप, कफ, पोटदुखी व श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या घेऊन एका दुसऱ्या हॉस्पिटलमधून झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. याआधी साहिलवर क्षयरोगाची ट्रीटमेंट सुरु होती. याविषयी अधिक माहिती देताना व साहिलवर उपचार करणाऱ्या झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट व फिजिशियन डॉ. उर्वी महेश्वरी म्हणाल्या, “झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल मध्ये साहिलला दाखल केल्यावर आम्ही त्याला आयसीयु मध्ये दाखल केले व वैद्यकीय चाचण्या केल्या असता त्याला क्षयरोगाची लागण न झाल्याचे निदान झाले व आम्ही त्वरित क्षयरोगावरील औषधे थांबविली.

साहिलच्या फुफुसामधून आम्ही एक लिटर फ्लुइड काढले व त्याला रक्त, पेटलेट्स , अल्बुमिन, स्टिरॉइडची ट्रीटमेंट सुरु केली. यापुढील चाचण्या केल्या असता पोटात व फुफुसांमध्ये पाणी झाल्यामुळे साहिलचे यकृत ४० टक्के खराब झाले होते व त्याला भविष्यात त्याला प्रत्यारोपणाची गरज भासणार होती परंतु आमच्याइथे उपलब्ध असणाऱ्या आधुनिक उपचारामुळे आठ दिवसांमध्येच यकृतातील अल्ब्युमिनच्या पातळीवर नियंत्रण आणले व आठवड्याभरात त्याला घरी पाठवण्यात आले”.

यकृतात काही खूप महत्त्वाची प्रथिनं बनवली जातात. रक्तातील ‘अल्ब्युमिन’ हे त्यातलंच एक प्रथिन आहे. यकृताचे कार्य बिघडल्यावर अल्ब्युमिन कमी होऊ लागतं. तेव्हा शरीरावर सूज येऊ लागते. त्यामुळे अल्ब्युमिन तयार होणं आणि त्याचं कार्य व्यवस्थित चालणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. साहिलवर उपचारासाठी अजून दोन दिवस जरी उशीर झालं असता तर यकृत प्रत्यारोपणाची गरज निर्माण झाली असती कारण झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याआधी साहिलचे यकृत ४० % खराब झाले होते अशी माहिती झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या पत्रकात दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.