सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
श्री. दिनाभाई मोरे शिक्षण संस्था सानेगाव संचालित महात्मा गांधी विद्यामंदिर चोरढे प्रशाळेच्या इमारतीच्या नूतन बांधकामाचे संकल्प समारंभ संपन्न करण्यात आला.
मागील दोन वर्षांपूर्वी ०३ जून २०१९ रोजीच्या निसर्ग चक्री वादळाचा तडाखा संपूर्ण रायगड जिल्ह्याला बसला त्यामध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर चोरढे प्रशाळेचे फार मोठे अतोनात नुकसान झाल्याने इमारतीचे संपूर्ण छप्पर उडाल्याने शाळा उघड्यावर पडली.सुरुवातीला संस्थेच्या वतीने आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सर्वोत्परी सहकार्याने इमारतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले परंतु पुनश्च जोरदार वादळ वारा आल्याने इमारतीचे छप्पर उडाल्याने इमारत पूर्णतः ढासलली यावर संस्था चालक व स्थानिक स्कूल कमिटी कार्यकारणी मंडळाची संयुक्तिक बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून योग्य मार्ग काढीत इमारतीचे स्लॅब मधील पक्के बांधकाम करण्याचे ठराव संमत करण्यात आले.
याकामी सर्व स्तरांतून पुढाकार घेत समाजातील दानशूर देणगीदार संस्थांची, व्यक्तींची आधार घेण्याचे ठरले असून मुरुड तालुका शिवसेना प्रमुख तथा रायगड जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष प्रशांत मिसाळ यांच्या अथक प्रयत्नांतुन जेएसडब्लू कंपनीच्या सीएसआर विभागाच्या माध्यमातून सदरील इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे.
०१ऑगस्ट २०२१ रोजी लोकमान्य बाळ गांगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत जुन्या इमारतीचे जीर्णोद्धार करणे कामी जीर्ण अवस्थेतील बांधकाम पाडून नवीन स्लॅब च्या पक्के बांधकाम करण्याचे संकल्प सोडण्यात आले यावेळी मौलिक मार्गदर्शन करताना प्रत्येक मान्यवरांनी अर्वजून सांगितले की इमारतीच्या नूतनीकरण करण्याकरिता सर्वांचेच सर्वोपरी मोलाचे योगदान व उत्तम प्रकारे सहकार्य लाभले.
याप्रसंगी श्री. दिनाभाई मोरे शिक्षण संस्था सानेगावचे चेअरमन नंदकुमार नामदेव म्हात्रे,रायगड जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष प्रशांत मिसाळ,स्थानिक स्कूल कमिटी कार्यकारणी मंडळ अध्यक्ष धर्मा भोईर,उपाध्यक्ष काशिनाथ तावडे,हरिश्चंद्र पाटील,ग्राम पंचायत सरपंच महेंद्र शेडगे,संस्था संचालक अनिल चोरढेकर,ज्येष्ठ सदस्य उमरभाई दाखवे,राम भोपी, जानू पाटील,शालेय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक थोरबोले सरांनी केले तर आभार पाटील सरांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..








Be First to Comment