सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्याजवळील सुकेळी (ता.रोहा) येथील जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलच्या दहावी व बारावी सीबीएसई बोर्ड परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये जिदंल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी उज्जवल यश संपादन केले आहे.
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल शुक्रवार दि.३० जुलै रोजी तर दहावीचा निकाल मंगळवारी दि.३ ऑगस्ट जाहीर करण्यात आला. यामध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये शिकणा-या ओम साळी या विद्यार्थ्यांने ९४.२०% गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला.तर अगस्त्य कर्नवाल याने ८७% गुणांसह दुसरा व लक्ष अग्रवाल ८३% गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला. तसेच इयत्ता दहावीमध्ये अथर्व दिपक थिटे याने ९७ % गुण मिळवत प्रथम क्रमांकाची बाजी मारली. तर राहुल काळे व मयुरेश कठे या दोघांनी ९३.२०% गुणांसह संयुक्तपणे दुसरा क्रमांक तर रुद्राक्ष मिश्रा याने ९२.८० गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता शर्मा, शाळा प्रबंधक समिती सदस्य शिवकुमार सिघंल, संजीव बॅनर्जी, आर.के.खंडेलवाल, झी लर्न लिमिटेडच्या शाळा निदेशक श्रीमती अंशु सक्सेना, उपमुख्याध्यापिका बिजल अवस्थी, व्यवस्थापक अजय यादव, तसेच सर्व शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment