Press "Enter" to skip to content

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे महाड व पोलादपूरमध्ये मोफत आरोग्य शिबीर

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

महाड – नवी मुंबई रायगड व ठाणे येथील नागरिकांच्या आरोग्य सेवेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर व ग्रामीण प्रगती फाऊंडेशनच्या सहकार्याने महाड व पोलादपूर इथे डॉक्टरांचे पथक पोहचले असून पूरग्रस्त ग्रामस्थांच्या आरोग्य हितासाठी व साथीच्या रोगांचा अटकाव करण्यासाठी मोफत फिरते प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीर व विनामूल्य औषध वाटप करणार आहेत.

कोकण विभागातील महापुरामुळे उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून पूरग्रस्त भागामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाची तसेच इतर साथरोगांचा फैलाव रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकेच्या नात्यातून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला रायगड जिल्हा प्रेसचे विशेष सहकार्य लाभले आहे. डॉक्टर, मदतनीस तसेच वार्ड बॉय अशी ११ जणांची टीम रविवारी रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झाली असून महाड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.

या आरोग्य शिबिरात टी टी चे इंजेक्शन दिले गेले तसेच तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांतर्फे दिलेले खाऊ वाटप ,धान्य वाटप तसेच कपडे पण देण्यात आली. या शिबीराचा पाचशेहुन अधिक लोकांनी याचा फायदा घेतला. या शिबिरास डेप्युटी कलेक्टर श्रीमती प्रतिभा पुंडेलवाड यांनी भेट देवून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे आभार मानले. विशेषतः ज्या कार्यालयात हे शिबीर झाले ते कार्यालय १४ फूट पाण्याखाली होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.