Press "Enter" to skip to content

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रवेश सुरु

सर्टिफिकेट, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अशा विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्टिफिकेट, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अशा विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु झाले आहेत .

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाने यशवंत मेमोरियल ट्रस्ट पनवेल या संस्थेला MBA , MCOM , BCA , B COM , BA , Preparatory Course for School Dropouts , Patient Assistant Certificate Course , Early Childhood Care & Education Certificate Course या अभ्यासक्रमांचे अधिकृत अभ्यासकेंद्र म्हणून पासून मान्यता दिलेली आहे ( Study Centre Code 3258A ) . प्रायमरी हेल्थ केअर सेंटर , रूरल हेल्थ केअर सेंटर , कम्युनिटी हेल्थ सेंटर , आशा वर्कर्स , हॉस्पिटल्स , येथे काम करीत असणारे तसेच आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणारे , रुग्ण सहायक प्रमाणपत्र शिक्षणक्रम ( Patient Assistant Certificate Course ) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात .

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता १० वी पास / नापास अशी आहे . प्री प्रायमरी स्कुल टीचर , प्रायमरी सेक्स टीचर , चाईल्ड केअर सेंटर , डे केअर सेंटर , स्कुल कौन्सेलर , स्पेशल एज्युकेशन टीचर , येथे काम करीत असणारे तसेच बालसंगोपन आणि रंजन शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणारे , बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम ( Early Childhood Care & Education Certificate Course ) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात .

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता १२ वी पास अशी आहे . बी.ए. / बी . कॉम . / बी . एस्सी . चा अभ्यास करणारे देखील कॉलेजबरोबर हा कोर्स करू शकतात .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.