रसायनी पाताळगंगा प्रायमा डाॅक्टर असोसिएशनकडून महाड तालुक्यातील पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
महाड येथे अतिवृष्टीमुळे लोकांना भयंकर अशा संकटांचा सामना करावा लागत आहे.एकतर कोरोना अन लाॅकडाऊनमुळे लोक आर्थिक अडचणीत सापडले असताना त्यात या अति मुसलधार, ढगफुटी सदृश पावसाने जीवनमान विस्कळित झाले आहे.यासाठी महाड तेथील पुरग्रस्ताने बाधित झालेल्या आपल्या कोकणी बांधवाना मदत मिळावी यासाठी रसायनी पाताळगंगा प्रायमा डाॅक्टर असोसिएशन कडून महाड तालुक्यातील शिरगावफाटा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर घेवून जनहिताचे महत्वाचे काम रसायनी तील डाॅक्टरबांधवांनी केले आहे.

पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी हा रसायनी पाताळगंगा प्रायमा डाॅक्टर असोसिएशन कडून निर्धार करुन यावेळी परीसरातील कोल, शिरगाव,चोचिंदे, किजंलघर, दादली,चोचिंदे वनिकोड भागातील 250 पेक्षा जास्त नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले.यावेली महाड तालुक्यातील अनेक नागरिकांना सर्दी,ताप, खोकला,पायाचा आजार तसेच शर्करा आजार झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.आजारग्रस्त रुग्णांना मोफत औषधोपचारही रसायनी पाताळगंगा प्रायमा डाॅक्टर असोसिएशनकडून करण्यात आले.
यावेळी रसायनीतील डाॅक्टरांनी पूरग्रस्तांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करुन स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला. डॉ.रोहित कदम, डॉ.मनोज कुचेरिया, डॉ.संजय कुरंगले, डॉ.युवराज म्हशीलकर, डॉ.राहूल यादव, डॉ.कुणाल कांबळे, डॉ.सुरेश बिस्नोही आदी उपस्थित होते.








Be First to Comment