सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच संकेत स्थळावर जाहीर करण्यात आला. यामध्ये को.ए.सो. च्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील अग्रवाल अग्रवाल विद्यामंदिरचे सर्व १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेने १०० टक्कयांसह निकालाचा उच्चांक गाठला आहे.
यामध्ये कु. अक्षता संजय खाडे या विद्यार्थीनीने ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर कु. गौरी श्रीरंग बोरकर (८७.६० टक्के) व कु. प्रिन्स कृष्णा ठाकूर (८६. ६० टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, मुख्याध्यापक उल्हास ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.







Be First to Comment