सिटी बेल | नागोठाणे | महेश पवार |
कोएसोच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाड तालुक्यातील भोराव या गावातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणुन, पाणी बिस्लरी बॉक्स, कोलगेट, खोबरेल तेल, कपड्यांचा व अंघोळीचा साबण, सॅनिटरी नॅपकिन, पुरूषांसाठी बरमुडा, महिलांसाठी गाऊन, टॉवेल, ब्लॅंकेट या वस्तूंची मदत केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. पी एन ज्योथी डॉ. विकास शिंदे यांच्या सहकार्याने याची अंमलबजावणी करण्यात आली.
डॉ. दिनेश भगत, डॉ. विलास जाधवर, डॉ मनोहर सिरसाट, सौ. स्मिता चौधरी, प्रा. हेमंत जाधव श्रीमती ज्योती पाटील, विकास नरावडे, श्रीमती विनया देशपांडे, श्रीमती मेघा पडळकर, किशोर घरत, सुर्यकांत वारगे, दिपक दाभाडे आदिंनी वस्तू व कपडे घेण्यासाठी अर्थिक मदत केली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.








Be First to Comment