सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रायगड जिल्हा परिषद शाळा विठ्ठल वाडी ,तालुका रोहा येथे राजखलाटी येथील सुपुत्र सध्याचे निवास स्थान मुंबई येथे असणारे गावातील प्रतिष्ठित नामवंत दानशूर व्यक्तिमत्व,.सुधीर मारुती मराठे तसेच त्यांचे मित्र भूषण खांडेकर व राजेश अग्रवाल यांच्या संयुक्त योगदानातून सुमारे ६० विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शा.व्य.समिती अध्यक्ष लक्ष्मण धनावडे,रोशन बारस्कर, प्रदीप निकम, दिलिपकाका,शैलेश शिर्के, गोफणकाकी, मुख्याध्यापक चंद्रकांत वरखले, सहा. शिक्षक कुंदन जाधव आदींसह शा.व्य.समिती सदस्य व विद्यार्थीवर्गाचे पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यीवर्गाची शैक्षणिक गरज लक्षात घेता गोरगरीब जनतेची सेवा म्हणून ३०० नोटबुक्स मुलांचे लेखन सुधरण्यासाठी व हस्ताक्षर चांगले होण्यासाठी दुरेघी वह्या आणि इंग्रजी लेखन सुधारण्यासाठी चार रेघी वह्या उजळणीसाठी बॉक्स वह्या आणि ए फोर साईज रजिस्टर आदी बरोबर पेन ,पेन्सिल, पट्टी ,खोडरबर व प्लास्टिक पाऊच आदी शैक्षणिक साहित्याचे वाटपासह विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.तर सुधीर मारुती मराठे तसेच त्यांचे मित्र भूषण खांडेकर व राजेश अग्रवाल यांनी शाळेत येऊन विद्यार्थी वर्गाला चांगल्या प्रतिचे शैक्षणिक वाटप केल्याने शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाने त्यांचे आभार व्यक्त करून विशेष धन्यवाद दिले आहेत.








Be First to Comment