सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील राजिप शाळा पालेखुर्दचे मुख्याध्यापक बाळकृष्ण म्हाञे आपल्या शिक्षकी सेवेतून सन्मानाने
निवृत्त झाले.
येथील युवा नेते महेश ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या या कार्यक्रम प्रसंगी.कृषी अधिकारी मढवी,कोलाड केंद्रप्रमुख,संभे उपसरपंच आदीती बाकाडे,सदस्या सई ठाकुर, सदस्य सखाराम मोरे,ग्रामसेविका सौ. म्हात्रे,नितेश ठाकुर,गणेश बाकाडे,सहादेव ठाकुर,गोविंद बाकाडे,गणेश ठाकुर,गणेश नरेन्द्र बाकाडे झोलगे,सुरेश शिंन्दे,धर्मेन्द्र शिन्दे,मढवी मँडम,पवार, दिसले,आशासेविका,अंगणवाडीसेविका,विद्यार्थि शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी व सभासद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
उपक्रमशिल शिक्षक तथा एक आदर्श शिक्षक म्हणून सर्वपरिचित असणारे बाळकृष्ण म्हात्रे यांनी आपल्या सेवाकाळात रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण ३६ वर्षे सेवा केली. तर पाले खु.येथे ते १० वर्षे सेवेत होते.त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी आज समाजात विविध क्षेत्रात चांगल्या हुद्द्यावर काम करीत आहेत. तर आपल्या संपूर्ण सेवाकाळात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केली नाही.तर विद्यार्थी वर्गासाठी नेहमीच विविधांगी उपक्रम राबवून आपला विद्यार्थी जास्तीत जास्त ज्ञानसंपन्न व सर्वगुणसंपन्न कसा होईल यासाठी त्यांचे नेहमीचेच प्रयत्न असायचे.त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ पाले खु.ग्रामस्थांनी सेवानिवृत्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या सेवेप्रती क्रुतज्ञपणाची भावना व्यक्त करून सपत्नीक सन्मान करून शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment