सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
सीबीएसई बोर्डाचा बारावी निकाल शुक्रवार दि.३० रोजी जाहीर करण्यात आला असुन या परीक्षेत जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूल १२ वी सायन्स मध्ये कोलाड आंबेवाडी नाका येथील रहिवाशी प्रकाश साळी यांचा सुपुत्र ओम प्रकाश साळी यांनी ९४.२०% गुण संपादन करुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
ओम साळी हा लहानपणापासून अभ्यासात हुशार असुन तो सीबीएसई १२ वी च्या परीक्षेत जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूल मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून त्यांच्या यशा बद्दल जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलचे मुख्यध्यापक, सर्व शिक्षक वर्ग तसेच कोलाड आंबेवाडी नाका येथील विविध स्थरावरील मान्यवरांनी ओम साळी याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment