Press "Enter" to skip to content

भारतीय मजदूर संघच्या पोर्ट फेडरेशन राष्ट्रीय खजिनदारपदी सुधीर घरत

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |

भारतीय मजदूर संघाच्या भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय खजिनदार या पदावर जेएनपीटीचे कामगार नेते सुधीर घरत यांची निवड झाली आहे. महासंघाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये फेडरेशनचे प्रभारी चंद्रकांत धुमाळ व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश्‍वर राव यांनी ही निवड केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. भवानी शंकाराडू व जनरल सेक्रेटरी सुरेश पाटील व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

जेएनपीटी बंदरात ठेकेदारी पद्धतीने काम करणार्‍या कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत, किमान वेतन मिळावे याकरिता सातत्याने प्रयत्न करुन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात कामगार नेते सुधीर घरत यांनी प्रसंगी आक्रमक होत कामगारांना न्याय मिळवून दिला.

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी सल्लागार असलेल्या जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष कामगार नेता अशी त्यांची ओळख आहे. अनेक तरुणांना नोकरी मिळवून देणे, उद्योगधंद्यात उभे राहण्यासाठी सहकार्य करणे अशी त्याचीं ओळख आहे.

भारतीय जनता पार्टीच्या ट्रान्सपोर्ट सेलच्या उत्तर रायगड जिल्ह्याची जबाबदारी ते पार पाडीत आहेत. त्यांच्या कामामुळेच नव्याने त्यांच्यावर भारतीय मजदूर संघाच्या पोर्ट फेडरेशनच्या राष्ट्रीय खजिनदार पदाच्या निवडीने राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांनी त्यांचे सहकारी कामगार मित्र सुरेश पाटील व राष्ट्रीय प्रभारी चंद्रकांत धुमाळ यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.