सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
दिघोडे गावचे सुपुत्र कमळाकर बाळाराम पाटील हे एम .आय .डी.सी अंधेरी येथे कार्यरत असताना ते कर्मचारी महासंघाचे काम करत होते. त्यांनी केलेल्या कार्याच्या बळावर कार्यकारी सद्स्य, जनरल सेक्रेटरी, कार्याध्यक्ष अशी पदे भुषवित महामंडळाची 36 वर्ष सेवा केली. सेवा निवृत्ती नंतर सुद्धा त्यानी एम .आय.डी सी.कर्मचारी महासंघाचे काम थांबविले नाही.त्यांच्या या कार्य प्रणालीवर खुश होऊन एम.आय.डी.सी.कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष चिर्ले गावचे कै.डी.बी.पाटील यांच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदी दिघोडे गावचे सुपुत्र श्री कमळाकर बाळाराम पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी एड.के.ए.पाटील, नगरसेवक डाउरकर, मोरे (मुंबई सचिव), प्रकाश कदम (मुंबई खजिनदार ), हांगे(उपाध्यक्ष औरंगाबाद ).श्री काटोडे (सचिव), कांबळे (कोकण अध्यक्ष), पुष्पा जाधव (कोकण उपाध्यक्ष ), संतोष पाडावे (महाड अध्यक्ष ), परदेशी (कार्याध्यक्ष पुणे ), पोल.कुंभार.सानिका सावंत (मुंबई), जागृती घरत (अलिबाग )आदी सह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
कमळाकर बाळाराम पाटील यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्द्ल त्यांचे दिघोडे गावच्या सरपंच सौ.सोनिया मयूर घरत, जयमातादी ग्रुपचे अध्यक्ष मयूर घरत, सदस्य शरद कोळी आदीसह दिघोडे ग्रामस्थ यानी त्यांचे अभिनंद केले. या त्यांच्या निवडी बदल त्यांच्यावर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment