Press "Enter" to skip to content

उरण मराठी पत्रकार संघातर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र अभिवादन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

मराठी माणसांच्या मनात महाराष्ट्र भूषण असे स्थान असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाचे शतक पूर्ण केलेल्या बद्दल त्यांच्या जन्मदिनी (दि.२९जुलै) उरण मराठी पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अभिवादन करताना उरण पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू म्हणाले की बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा हे महानाट्य निर्माण करुन मराठी माणसाच्या मनात , शिवरायांचे शोर्य , कर्तुत्व ,नेत्रुत्व ,विनम्रता आणि कल्याणकारी राजा असे शिल्प कोरून ठेवले असल्याचे सांगितले.

यावेळी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष धनंजय गोंधळी, उपाध्यक्ष जे. एस. घरत, सल्लागार संजय गायकवाड सचिव रामचंद्र उध-या म्हात्रे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना अभिवादन केले.यावेळी कोषाध्यक्ष पालू भिंडे, सुयोग गायकवाड, राजेंद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम कोरोनाचे बंधन व दक्षता घेवून पार पाडण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.