Press "Enter" to skip to content

जाताडे गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कोरोना महामारीत केलेल्या सामाजिक कार्य, आरोग्य विषयक कार्य व रक्तदान शिबिरे अशा विविध कार्याने प्रभावित होऊन तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने शेतकरी कामगार पक्षाचे रसायनी जाताडे गावतील युवा कार्यकर्ते महेंद्र गायकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेनेत जाहीर प्रवेश करत भगवा ध्वज खांद्यावर घेतला.

यावेळी जाताडे शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण करण्यात आले.तसेच जाताडे गावातील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आपल्या कुटूंबियांसहित शिवसेनेत प्रवेश केला,शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांना भगवी शाल अर्पण करून सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि आपण शिवसेनेत ज्या विश्वासाने प्रवेश करत आहात त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही तसेच आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पूर्ण उरण विधानसभा मतदार संघामध्ये कामे सुरु आहेत त्याचप्रमाणे आपल्या गावातील देखील विकासकामे पूर्ण होतील असे आश्वासन यावेळी दिले.

याप्रसंगी उपजिल्हा संघटक परेश पाटील, तालुकासंपर्कप्रमुख अनंताशेठ पाटील, उरणतालुका प्रमुख संतोषशेठ ठाकुर, युवासेना उपजिल्हाप्रमुख अवचित राउत, युवासेना पनवेल तालुका अधिकारी केवल माळी, उपतालुकाप्रमुख विष्णु लहाने, उपतालुकाप्रमुख जगदीश मते, उपतालुका संघटक सुधीर पाटील, अनंत पाटील, बारवई सरपंच निलेश बाबरें, विभागप्रमुख ज्ञानेश्वर माळी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गायकर, युवासेना आदित्य गाताडे, प्रमोद गोले, एन.झेड. पाटिल, मनोज भंडारकर, दिपक पाटील शाखा प्रमुख, गणेश खुटले नांदगाव शाखा प्रमुख, दीपक मुंडे सोमाटणे, विनोद पाटील, खारघर युवा अधिकारी, विनोद पाटील, ग्राम.सदस्य देवळोली,आदिती अविनाश गव्हाणकर ग्राम.सदस्य देवळोली, मनस्वी मनोज भंडारकर ग्राम.सदस्य देवळोली,अविनाश गव्हाणकर, मोहन देशमुख, जयदास पाटील, राजेश पाटील शाखाप्रमुख देवळोली, सचिन पाटील उपशाखाप्रमुख, कृष्णा सुर्यराव उपशाखाप्रमुख, संजय बडवी, महेंद्र पाटील, शंकर पाटील, प्रदीप पाटील , स्वप्नील पाटील, कैलास पाटील, रमेश देशमुख, नामदेव पाटील, निलेश गव्हाणकर, तसेच विभागातील कार्यकर्ते व महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.