सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील |
महाड तालुक्यांतील सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे महाड शहर व आजुबाजूच्या गावांचे मोठी वाताहत झाली होती.याचे भान ठेवून उरण तालुक्यांतील पागोटे येथील जाणता राजा प्रतिष्ठान च्या वतीने उरण मधील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते .या आवाहनाला उरण तालुक्यांतील चांगला प्रतिसाद दिला होता.जमा झालेले साहीत्य महाड येथील गणेश नगर ,बिरवाडी ,कोंडीवले व अदिवाशी वाड्यांना वाटप करण्यात आले.

या वेळी सह्याद्री प्रतिष्ठान चे शिलेदार आदेश उतेकर व संजय पिंगळे यांनी महाड मधील पूरग्रस्त लाभार्थी दाखविण्याचे मोलाचीमदत झाली. या वेळी जानता राजा प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक पाटील,धिरज पाटील,मयुर पाटील ,उमेश पाटील ,जितेंद्र पाटील ,विशाल पाटील ,रोशन पाटील ,ऋषिकेश पाटील आदि कार्यकर्त्यांनी परिक्षम घेतले होते.








Be First to Comment