Press "Enter" to skip to content

गॅस टरबाईन मार्गाने बोकडविरा वरून एसटी बस सुरू करण्याची मागणी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

गॅस टरबाईन मार्गाने बोकडविरा वरून एस.टी बस सेवा सुरु करा. याबाबतचे निवेदन जनवादी महिला संघटनेच्या वतीने तहसीलदारांना,व बस डेपो आगर प्रमुखांना निवेदन दिले.

फुंडा, डोंगरी,पाणजे वायु विद्युत वसाहत,या लोकांसाठी गेली अनेक वर्षे बोकडविरा हा बस स्थानक आहे. सिडकोने बांधलेला पूल धोकादायक झाल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भेंडखळ मार्गे द्रोणागिरी नोड अशी वळवण्यात आली आहे. त्यामुळे चार गावांतील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस पकडण्यासाठी उरण कीवां टाऊनशिपला जावं लागतं. त्यामुळे बस सेवा भेंडखळ मार्गे गॅस टरबाईन मार्गाने वळवून बोकडविरा मार्ग करावा ,उरण , शेवा ,बोकडविरा वायू विद्युत वसाहत गॅस टरबाईन मार्गाने करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी जनवादी महिला संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.