सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उरणमधील काही गावात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांचे त्वरित पंचनामे करून शासकीय मदत मिळावी अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पंचनामे केले असून लवकरच शासकीय मदत मिळेल असा विश्वास तहसीलदारांनी व्यक्त केला
उरण तहसील कार्यालयातून तालुक्यातील एकूण ७१५ घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामध्ये चिरनेर ३६९, विंधणे १०, जासई ५७, वेश्वी ३१, चिर्ले ४८, जसखार १४९, सवरखार ३१, करळ ४, कोप्रोली ३, सोनारी ७ मुळेखंड १, चाणजे ३, वशेणी १, सारडे १ आदीं घरांचा समावेश असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
मुसळधार पावसामुळे मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेची तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडून पाहणी करण्यात आली.
उरण तालुका मराठी पत्रकार संघाने पूरग्रस्तांचे पंचनामे करून लवकरात लवकर शासकीय मदत देण्याची मागणी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्वरित पंचनामे केले असून मदतही येत्या काही दिवसांत वाटपास सुरुवात होईल असा विश्वास तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी व्यक्त केला आहे. पत्रकार संघाच्या मागणीचा विचार करून पंचनामे झाल्याने लवकरच मदतही मिळेल असे सांगत तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना संघाचे कार्याध्यक्ष संजय गायकवाड यांनी धन्यवाद दिले आहे.








Be First to Comment