सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
भारतीय मजदूर संघाचा ६६ वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे BMS चे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड अनिल डुमणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तथा पोर्ट महासंघाचे सरचिटणीस सुरेश पाटील, मुंबई BMS चे अध्यक्ष बापू दडक,जेष्ठ कामगार नेते राम भगत,माजी विस्वस्त रवी पाटील, महासंघाचे राष्ट्रीय खजिनदार सुधीर घरत,युनियनचे सरचिटणीस जनार्दन बंडा,नवनिर्वाचित रायगड जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाटील तसेच कामगार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांची देशात एक नंबरची असलेली कामगार संघटना आहे.६६ व्या वर्धापनदिना निमित्त सर्व युनियनवर झेंडा लावणे आणि कार्यक्रम आयोजित करणे अशाप्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आणि रायगड जिल्ह्यात २५ ठिकाणी झेंडा लावणे आणि तीन ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल डुमणे यांनी कामगारांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी, कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी कामगार संघटना आहे असे प्रतीपादन केले. प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना सुधीर घरत यांनी केली तर आभार जनार्दन बंडा यांनी मानले.








Be First to Comment