महीलेवर चढवला भयानक हल्ला, महीला रूग्णालयात दाखल
सिटी बेल | उरण | अजित पाटील |
उरणच्या खोपटे गावातील नागरिक मागील दोन दिवसांपासून एका वेगळयाच चिंतेत आहेत . या गावात एक पिसाळलेला कुत्रा अगदी कुणाच्याही सहज चावा घेत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत ! आत्तापर्यंत या कुत्र्याने तब्बल 21 जणांच्या चावा घेतला असल्याने नागरिक आता घराच्या बाहेर पडताना तोंडाला मास्क बरोबरच हातात काठी घेतल्याशिवाय बाहेरच पडायला घाबरत आहेत. महिला आणि लहान मुलांना ही या कुत्र्याने चावा घेतला असून एका वयस्कर महिलेला तर उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करावी लागली असल्याची घटना समोर आली आहे .
देशभरात सध्या कोविडच्या असलेल्या भीतीने आधीच नागरिक कमालीचे चिंतेत आहेत. त्यातच पावसाळ्याने ही घरातून बाहेर पडायला ही उसंत दिलेली नाही . त्यातूनच मागील दोन दिवस जरा उन्हं पडू लागली असल्याने नागरिक घराबाहेर पडू लागलेली असतानाच उरणच्या खोपटे पाटीलपाडा गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने मोठी दहशत निर्माण केली आहे.

हा कुत्रा अगदी समोर भेटणाऱ्या कुणाच्या ही अंगावर जाऊन चावा घेत आहे . त्याने अत्ता पर्यंत सुमारे 21 जणांना चावा घेतला आहे त्यातील एक पाटील पाड्यातील वयस्कर महिला आज सकाळी तुळशीला वंदन करीत असतांना अंगणात आलेल्या त्या कुत्र्याने थेट त्या महिलेवर हल्ला चढविला आणि पायाच्या पोटरीवर करकचून चावा घेतला असल्याची घटना घडली आहे.
या कुत्र्याने पाटील पाडा गावातीलच आत्ता पर्यंत 12 ते 15 लोकांच्या चावा घेतला आहे तर एकूणच खोपटे गावातील सुमारे 21 जणांच्या चावा घेतला असल्याने नागरिकांत कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्याचा यंत्रणेने योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत .








Be First to Comment