सिटी बेल | पनवेल | सुनिल ठाकूर |
आजच्या कोरोना महामारी च्या कठिण काळात रक्ताचा मोठा तुटवडा भासत असल्याने आज पनवेल मधील ७ रोटरी क्लब्स ने एकत्र येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले. रोटरी नविन पनवेल रक्तपेढी यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
ह्या प्रोजेक्ट मध्ये
रोटरी क्लब ऑफ पनवेल,
रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल,
रोटरी क्लब ऑफ कळंबोली,
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन,
रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर,
रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायझन ह्या सात क्लब ने सहभाग घेतला होता एकूण 44 जणांनी रक्तदान केले.
प्रोजेक्ट चे उदघाटन डी.जी. ई. रो.डॉ. अनिल परमार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रो.डॉ.हेमा परमार , रोटरी डिस्ट्रिक्ट ओफीसर रो.अविनाश कोळी, ए.जी.रो.भरत शिंदे, रो.अलका कोळी, आणि ईतर डिस्ट्रिक्ट ओफीसर उपस्थित होते. आजचा उपक्रम राबविण्यात क्लब चे प्रेसिडेंट रो. विजय मंडलिक, प्रेसिडेंट रो. डॉ. मीना बिस्वाल,
प्रेसिडेंट रो. डॉ. किरण कल्याणकर,
प्रेसिडेंट रो.प्रणिल बारटक्के,
प्रेसिडेंट रो. रवी नाईक,
प्रेसिडेंट रो. दिलीप महाडिक,
प्रेसिडेंट रो.गुरुदेवसिंह कोहली, यांनी विशेष मेहनत घेतली व आजचा कार्यक्रमास रक्त दात्यां चा उत्तम प्रतिसाद लाभला.








Be First to Comment