Press "Enter" to skip to content

को ए सो इंदुबाई आ.वाजेकर शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

सिटी बेल | पनवेल |

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम स्कूल ,पनवेल मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा कोविडचे नियम पाळून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला शाळा समितीचे सभापती व्ही.सी.म्हात्रे, शाळा समिती सदस्य एन.ए.वाजेकर , एस.एम.देशपांडे, विरोधीपक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे आणि सौ.अंजली उर्हेकर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमात सुरुवातीला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मानसी कोकीळ यांनी नवनिर्वाचित शाळा समिती सदस्य श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे आणि सौ अंजली उर्हेकर यांचे स्वागत केले.

यावेळी सर्वाधिक गुण मिळवून प्रथम 5 आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कु.वैष्णवी संजय मचाले प्रथम ,कु. सय्यदा अब्दुल मतीन शेख द्वितीय, कु.तनिषा सुभाष गोवर्धने तृतीय, कु.तनु संदीप सिंग चतुर्थ,कु. श्रेया भगवान पाटील पाचवी अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा आणि सोबत त्यांच्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोविड काळामध्ये शिक्षकांनी प्रथम स्वतः ऑनलाईन शिक्षण पद्धती अवगत करून विद्यार्थ्यांना अगदी मनापासून शिकवल्याबद्दल शाळा समितीचे सभापती श्री व्ही सी म्हात्रे यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले त्याबरोबरच सर्व शिक्षण ऑनलाइन असतानादेखील विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने मन लावून अभ्यास करून जे यश मिळविले त्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना आयुष्यात पुढे खूप मोठ्या संधी आहेत . तरुणांनी भारतीय लष्कराकडे सुद्धा आपले करिअर म्हणून पहावे त्यामध्ये ही खूप मोठी संधी आहे. कामासोबतच देशसेवा केल्याचेही मोठे समाधान यात आहे असे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शाळा समिती सदस्य प्रितम म्हात्रे यांनी सांगितले की, तरुणांना आपल्या देशात भरपूर संधी आहेत. विद्यार्थ्यांना ज्याची आवड आहे त्याच गोष्टीकडे त्यांनी करिअर म्हणून पहावे आणि पालकांनी त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे.

देशाचे भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे, आता विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत.फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रामध्ये सुद्धा भविष्यामध्ये खूप मोठी संधी आहे असे मार्गदर्शन शाळा समिती सदस्य एस.एम.देशपांडे यांनी केले.

या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा पाटील केले होते. विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीतही अभ्यासात सातत्य ठेवून यश संपादन केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.