Press "Enter" to skip to content

पनवेल-उलवे नोड मधील महिला भगिनींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कोरोना महामारीत केलेल्या सामाजिक कार्य, आरोग्य विषयककार्य व रक्तदान शिबिरे आशा विविध कार्याने प्रभावित होऊन रविवार दिनांक २५ जुलै २०२१ रोजी पनवेल येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी सौ.सोनल मनोज घरत यांच्या प्रयत्नाने उलवे नोड मधील महिला कार्यकर्त्यानी जिल्हाप्रमुख कार्यालय, उरण येथे रुखसार कापडी यांच्यासह, रुचिका लेडवानी, वैशाली देवकर, वनिता आंबोळकर, सुरेखा तुपे, जागृती संजय वाघमारे, आशा नरेश म्हात्रे, आशिया डोंगरकर, रेश्मा पवार, स्वप्नाली वाघमारे, राजकुमारी यांनी आपल्या कुटूंबियांसहित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सर्व प्रवेश कर्त्यांना भगवी शाल व शिवबंधन बांधून सर्व भगिनींचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सर्व महिला भगिनींना संबोधताना सांगितले कि, आपण शिवसेना पक्षात येत असताना तुम्ही सर्व माझा बहिणी असून नक्कीच तुमचा पक्षामध्ये सन्मान करण्यात येतील व आदराची वागणुक दिली जाईल. तसेच तुमच्या प्रत्येक प्रसंगामध्ये शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असेल असे आश्वासन प्रवेश करणाऱ्या महिलांना दिले. तसेच उलवे नोड मध्ये जास्तीत जास्त शिवसेना पक्षाची वाढ करून पक्ष भक्कम करावा असे आवाहन केले.

याप्रसंगी महराष्ट्र वाहतूक से.जि.कार्याध्यक्ष पी.एस.मुंगाजी, शहरप्रमुख मनोज घरत, उपतालुकाप्रमुख विठ्ठल मुंगाजी, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, विभागप्रमुख सुनिल पाटील, विभागप्रमुख एस.के.पुरो, वडघर जि.प.सं.प्रमुख प्रदिप म्हात्रे, शिवसेना शाखा कोपर संघटक संतोष घरत, युवासेना अधिकारी सुरज म्हात्रे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.