सिटी बेल | उरण |
2 ऑगस्ट वर्धापनदिन उरण पनवेल तालुक्याकरिता उरण येथे साजरा करणार असल्याची माहिती आमदार बाळाराम पाटील यांनी दिली.
उरण येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची सभा पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले, उरण व पनवेल तालुक्यातील कार्यकर्त्यांच्यासाठी उरण येथे द्रोणागिरी शंकर शेठ इंटर नॅशनल शाळेत 2 ऑगस्ट रोजी वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी कोविड चे नियम लक्षात घेऊन गर्दी न करता कार्यक्रम घेण्यात येईल. प्रत्येकांनी आपली गाडी व घर याना झेंडे लावून मनामध्ये शेकाप ची ज्योत कायम ठेवायची आहे. ज्या कार्यकर्त्यांचा मतदार यादीत फोटो नसेल त्यांनी आपले रंगीत फोटो तहसीलदार कार्यालयात सादर करावयाचे आहेत. त्यांची मुदत 31 जुलै तारखेपर्यंत आहे.
यावेळी पक्षाच्यावाढी संदर्भात बोलताना आ.बाळाराम पाटील पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे येणारा काळ आपलाच आहे. येणाऱ्या उरण नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून कसे येतील यावर भर दिला जाईल. पनवेल महानगरपालिका वर शेकाप चा लाल बावटा फडकविणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सुरुवातीला प्रास्ताविक तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांनी केले. यावेळी सभापती सागर कडू, शहर चिटणीस शेखर पाटील, युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे आदींनी आपले विचार मांडले. यावेळी 1984 च्या आंदोलन त भाग घेतलेले नागाव मधील जेस्ट कार्यकर्ते किसन घरत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ओएनजीसी भरतीत उत्कृष्ट कार्याबद्दल वीरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मा सभापती नरेश घरत. प स सदस्य वैशाली पाटील, महादेव बंडा, महेश म्हात्रे, सीमा घरत, लता पाटील, नयना पाटील, नाहिदा ठाकूर, रंजना पाटील, ऍड पाटील, वंदना कोळी, अनंत पाटील, कुंदन पाटील, दत्ता घरत, सुरेश पाटील, रवी घरत, नयन म्हात्रे, नारायण पाटील, यशवंत ठाकूर, भारत राज थळी, सुरेश पाटील, मोरेश्वर भोईर आदी कार्यकर्ते हजर होते.








Be First to Comment