Press "Enter" to skip to content

सुधागड विद्यासंकुल कळंबोली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात

सिटी बेल | कळंबोली | मनोज पाटील |

सुधागड एज्यकेशन सोसायटी च्या कळंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक (मराठी विभाग ) व माध्यमिक (हिन्दी विभाग ) च्या सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांना गुलाबपुष्प व भेटवस्तू देवून प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी गुरू शिष्य यांच्या नात्यांचे महत्व सांगून उपस्थित शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचार्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी उपमुख्याध्यापिका सरोज पाटील ,पर्यवेक्षक शंकर भोसले,श्री.भद्रशेट्टे कार्यालयीन अधिक्षक दत्ता शिंदे ,वरिष्ठ लिपिक बिना पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.