सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड परिसरातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यांना मदतीची हातभार म्हणून उरण तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने खारीचा वाटा उचलत मदत केली आहे.
गेले ३ ते ४ दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड परिसरात होत्याचे नव्हते झाले. दरड कोसळून काहींना जीवाला मुकावे लागले तर अनेकांच्या घरात पाणी घुसून कुटूंबाच्या कुटूंब रस्त्यावर आले. घरात खाण्यासाठी ही अन्नपदार्थ शिल्लक राहिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर संकट कोसळले होते. त्या पूरग्रस्तांना मदतीची नितांत गरज होती. त्यामुळे अनेक मदतीचे हात पुढे आले व येत आहेत.
उरण तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने माणुसकीच्या भावनेतून खारीचा वाटा उचलण्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून मदत म्हणून अन्नधान्य व खाऊचे सामान घेऊन ते वाटप करण्यासाठी गेले आहेत.








Be First to Comment