मोहोपाडा प्रिआ स्कूलकडून कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांची शैक्षणिक फि माफ
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे.कोरोना संसर्ग कधी, कुठे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतिषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.या आजाराने वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीतील जवळपास 68 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
घरातील कुटूंबाचा कर्तां पुरुषच कोरोना आजारात मरण पावल्याने कुटूंबाची गुजराण कशी करायची,या विचारात कुटुंब सदस्य आहेत.शिवाय मुलांचे शिक्षण, शैक्षणिक फि कोठून भरायची या समस्या असताना काही नागरिकांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांच्याकडे व्यथा मांडली. यावेळी दिपक कांबळी यांनी मोहोपाडा प्रिआ स्कूलमधील ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामध्ये दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले आहेत.
अशा पालकांच्या मुलांची शैक्षणीक फी संपूर्णतः माफ करण्यात यावी,अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांनी प्रिआ स्कूल कमिटीकडे केली होती.या मागणीला अनुसरून कोरोनात मयत पालकांच्या मुलांची शैक्षणिक फि माफ करणार असल्याचे प्रिआचे अध्यक्ष सुनिल कदम यांनी सांगताच मनसेच्यावतीने प्रिआ असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल कदम यांचे आभार मानण्यात आले.








Be First to Comment