सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
सारडे विकास मंचचे खजिनदार रोशन पाटील यांचा वाढदिवस नेहमीच एक समाजकार्य करून सारडे विकास मंचतर्फे साजरा केला जातो. कधी शाळेतील मुलाना हॅन्डवॉश वाटप, अदिवासी वाडीवर कपडे वाटप, आंगणवाडी मुलाना जेवणाचे डब्बे वाटप तर कधी सारडे गाव सॅनिटायझर करण अशा नवनवीन संकल्पनेने साजरा केला जातो यावर्षी मात्र चर्चेत आसलेल्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरण पर्यटकांचा वाढता ओघ आणि वाढत्या पसंतीच ठिकाण म्हणून पर्यटक कोमनादेवी ऑक्सिजन पार्क ला भेट देण पसंद करत आहेत त्यामुळं येणाऱ्या पर्यटकाना छोटा निवारा आणि एक आकर्षण म्हणून बांबु हट(झोपडी) तयार करण्यात आले आहे.
ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी सारडे गावचे किशोर जयवंत म्हात्रे, विश्वनाथ जयवंत म्हात्रे या दोन बधुंच्या कलाकारीन सुंदर बाबू हट तयार करण्यात आली त्यात प्रमोद पाटील याच सहकार्य लाभले आहे. या दोन्ही बंधूच सारडे विकास मंचतर्फे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी अमेया लॉजिस्टिकचे अधिकारी प्रकाश महाजन, चंद्रहास माळी, सारडे विकास मंच उपाध्यक्ष संपेश पाटील, खजिनदार रोशन पाटील, कार्याध्यक्ष रोहित पाटील, क्रांतीलाल म्हात्रे, त्रिजन पाटील, विलास पाटील, जितेंद्र पाटील, चंद्रहास माळी यांची उपस्थिती लाभली रोशन पाटील यांना सारडे विकास मंच परिवारातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment