सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
आषाढी एकाधशीचे औचित्य साधून संतसंस्मरण भक्ति काव्यगजर काव्य संमेलन गुगल मीट या ॲपवर अ.भा.त्म.सा.परिषद मंडणगड शाखेतर्फे उत्साहात संपन्न करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे अंतर्गत मंडणगड तालुका शाखा, रत्नागिरी विभाग, कोकण प्रदेश यांचे वतीने तिसरे भव्य राज्यस्तरीय आँनलाईन “संतस्मरण भक्ती काव्यगजर काव्यसंमेलन” संतस्मरण आणि विठुमाऊली नामाचा काव्यगजर संमेलन प्रसंगी मोठ्या संख्येने कवी व कवयित्री यांनी महत्वपूर्ण सहभाग नोंदवला होता.

या संमेलनाचे सुरूवातीला गणेशवंदना, ईशस्तवन आणि राष्ट्रीय संस्थापक स्वर्गीय राजकुमार काळभोर यांना आदरांजली वाहून हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा डॉ. अलका नाईक आणि संमेलनाध्यक्ष तथा अखिल भारतीय कोकण प्रदेशाध्यक्ष डॉ. रसनकुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे रिजनल डायरेक्टर, मुंबई, डॉ. वामन नाखले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेविषयी खूप चांगले उद्बोधन केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे यांचे आशिर्वाद लाभले. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती शुभांगीताई काळभोर, यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फुलचंदजी नागटिळक यांचीही उपस्थिती व मार्गदर्शन या कार्यक्रमास लाभले. भक्तिमय वातावरणात अनेक रसिकांनी संतसाहित्याचे तसेच स्वलिखित रचनांचे काव्यगायन करून आनंदाचा आस्वाद घेतला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा कार्यक्रम विशेष आयोजित करण्यात आला होता.या भक्तीकाव्य कार्यक्रमाचे व सूत्रसंचालन मंडणगड शाखा उपाध्यक्षा सौ. संगीता पंदिरकर यांनी केले. या निमित्ताने पंढरपुरातील सुखसोहळा घरातूनच सर्व भक्तांना अनुभवता आला असे वक्तव्य उपस्थितांनी केले. सौ. जयश्री नांदे यांनी सुश्राव्य ईशस्तवन करून कार्यक्रमाची सुरुवात केली, अवघी दुमदुमली पंढरी हा भक्ती गजर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांच्या घरातच दुमदुमला, वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे सर्वांनी मिळून पसायदान म्हणून सांगता केली. अशाप्रकारे कोरोना काळातील निराशेवर मात करून अतिशय भक्तीमय व आनंदी तसेच धार्मिक तथा अध्यात्मिक वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.








Be First to Comment