Press "Enter" to skip to content

मोरा पोलीस स्टेशनच्या ठिकाणी दारुड्यांचा हैदोस, महिलांची सुरक्षितता धोक्यात

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण शहरातील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयासमोर मोरा पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. तिथे वीज सुद्धा नाही. सदर परिसरात पोलिस स्टेशनचे इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र या ठिकाणी कोणीही नसल्याचे पाहून दारुडे,गर्दुले यांनी आपले ठाण मांडले आहे. आपला बसतानच येथे मांडला आहे.दररोज येथे काही व्यक्ती दारू पिण्यासाठी येत आहेत. येथून जवळच असलेल्या रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या महिलांना, मुलींना याचा नाहक त्रास होत आहे.त्यामुळे महिलांची सुरक्षितता यामुळे धोक्यात आली आहे.

सदर या परिसरात दारू पिणारे, टाइमपास करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका संघटक सतीश पाटील, विभाग प्रमुख विभाग अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्याकडे केली आहे.

उरण पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी कोणी अवैध आणि बेकायदेशीर कामे करत असतील, महिलांना त्रास देत असेल तर त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे रवींद्र बुधवंत यांनी सांगितले. या समस्या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत यांनी तपास करण्याचे व संबंधितांवर कायदेशीर करण्याचे आदेश उरण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.