Press "Enter" to skip to content

शिवसपंर्क अभियानाच्या माध्यमातून उरण नगरपरिषदेवर भगवा फडकविण्याचा संकल्प

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

महाराष्ट्रात शिवसेना पक्षाच्यावतीने जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेडोपाडी शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. रायगड जिल्ह्यात वरिष्ठाच्या आदेशानुसार उरण तालुक्यातही शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. उरण शहर येथील तेरापंथी हॉल, वाणी आळी येथे शिवसंपर्क अभियानंतर्गत शिवसेना उरण शहर शाखेची सभा मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस असल्याकारणाने तसेच शिवसंपर्क अभियानाचे औचित्य साधून शिवसेना शहर शाखेतर्फे नागरिकांना मास्कचे वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT )चे विश्वस्त -दिनेश पाटील, उपजिल्हा संघटक -ममता पाटील, कोकण कार्याध्यक्ष शिक्षक सेना -कौशिक ठाकूर, उपजिल्हा अध्यक्ष -अन्वर कुरेशी,कक्ष जिल्हा प्रमुख -गणेश म्हात्रे,उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक -बी एन डाकी, तालुका संपर्क प्रमुख -जे पी म्हात्रे,तालुकाध्यक्ष अवजड वाहतूक सेना -चेतन म्हात्रे,तालुका संघटिका -सुजाता गायकवाड, विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, युवा सेना पदाधिकारी -निलेश पाटील, शहर संपर्क प्रमुख -गणेश म्हात्रे,कामगार नेते महादेव घरत,उरण नगर परिषदेचे गटनेते गणेश शिंदे,नगरसेवक अतुल ठाकूर,नगरसेवक -समीर मुकरी, नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेविका विद्या म्हात्रे,माजी नगरसेवक निलेश भोईर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शिवसंपर्क अभियानंतर्गत शहर शाखेतर्फे भरविलेल्या सभेत उपस्थितांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर, दिनेश पाटील, नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, गणेश शिंदे आदि मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थितांना आवाहन करताना म्हणाले की, शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्याने कोरोना काळात उरण तालुक्यातच नाही तर संपूर्ण राज्यात उत्तम काम केले आहे. म्हणूनच एका संस्थेच्या सर्वे नुसार भारतात उद्धव ठाकरे हे एक नंबरचे मुख्यमंत्री ठरले आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली पाहिजे. शिवसेनेच्या माध्यमातून उरण शहरात, उरण तालुक्यात शिवसेनेने अनेक कामे केली आहेत. अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनामध्ये अनेकांचे प्राण वाचविले आहेत.

शिवसेनेने नेहमी 80 % समाजकारण तर 20 % राजकारण केले आहे.उरण मध्ये जनतेचे सर्वाधिक काम शिवसेनेने केले आहे. नागरिकांच्या मदतीला धावून येणारा कोणता पक्ष असेल तर तो शिवसेना पक्ष आहे. जनतेचा सर्वाधिक विश्वास शिवसेनेवर असल्याने उरण तालुक्यात, रायगड जिल्ह्यात संबंध महाराष्ट्रात विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मुस्लिम बांधवही मोठया प्रमाणात शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.

येत्या काही महिन्यात उरण नगर परिषदेचे निवडणुका असून या नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण नगर परिषदेत जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याकडे लक्ष द्यावे. नगर परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. असे आवाहन मनोहरशेठ भोईर यांनी केला .

उरण नगर परिषदेवर यावेळी शिवसेनेचा भगवा फडकविणारच असा निर्धार शिवसेनेच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला. या शिवसंपर्क अभियानात शिवसेनेने भाजप पक्षावर जोरदार हल्ला चढवीला. गणेश शिंदे, संतोष ठाकूर यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.


उरण शहर प्रमुख विनोद म्हात्रे, शहर संघटक -भूषण घरत, दिलीप रहाळकर, उपशहर प्रमुख -कैलास पाटील, अरविंद पाटील, गणेश पाटील, शहर प्रमुख युवा सेना नयन भोईर, शहर संघटिका -विना तलरेजा, मेघा मेस्त्री, शहर संपर्क संघटिका -श्रद्धा सावंत, श्रीमती वंदना पवार, उपशहर संघटिका रजिया शेख या शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर शिवसंपर्क अभियान सभा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक महेश गावंड यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.